राजकीय लोकशाहीतील महिलांचा टक्का वाढणे, ही केवळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी, सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक पायरी आहे

एक महिला पंतप्रधान होऊन देशातील महिलांची स्थिती बदलत नाही, तर सर्वस्तरीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा टक्का जेवढा वाढत जाईल, तेवढी ती विकसित होत जाईल. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वामुळे विकासाचे दृष्टीकोन, कामाची दिशा, ध्येय-धोरणे, प्रश्नांची मांडणी आणि उपाययोजनांची संधी हा साराच अवकाश बदलत असल्याचे पंचायत राज व्यवस्थेने सिद्ध केले आहे. आमूलाग्र बदल झाले, तरच राजकारणातील ‘ग्लास सीलिंग’ भेदणे शक्य आहे.......